Skip to main content

Posts

Showing posts with the label #पुण्यातून #कन्याकुमारी

पुण्यातून कन्याकुमारी सायकलने गाठणारा "इडियट'

पुणे- कधी धो- धो पाऊस; तर कधी अंगाची लाही करणारे ऊन, अशा प्रतिकूल परिस्थितीत सायकलने घाट, किनारी रस्ते, घनदाट जंगलातून दिवस- रात्र एकट्याने प्रवास करत "त्याने' हा सतरा दिवसांत एकूण 1650 किलोमीटरचा प्रवास केला. पुण्याच्या अक्षय वारघडे याने नुकताच हा पुणे ते कन्याकुमारी प्रवास पूर्ण केला आहे. तो सध्या 21 वर्षांचा असून, वाघोली येथील ए. आय. एस. एस. एम. एस. सी. ओ. डी. महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. या प्रवासाबद्दल अक्षय म्हणाला, ""या प्रवासाची सुरवात मी पुण्यातून लाल महालापासून केली. प्रवासादरम्यान सुरवातीचे दोन दिवस चांगले गेले. मात्र गोव्यामध्ये पोचल्यावर प्रवासातील कठीण टप्पा जाणवू लागला. तेथील उष्ण वातावरण आणि घसरडे रस्ते यामुळे सायकल चालवायला त्रास होत असे. परंतु प्रवास सुरूच ठेवला. कोचीमध्ये प्रवास करत असताना मुसळधार पाऊस चालू होता. रस्त्यांचा अंदाज नसल्यामुळे एका ठिकाणी खड्ड्यात पडलो. पायाला दुखापत झाली होती. परंतु रस्त्यावर आसपास कोणीही नव्हते. तसाच उठलो आणि सायकल चालवून मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. तळपायाचे सालटे निघाले होते...