Skip to main content

Posts

Showing posts with the label cashless-in-mumbai-temple

मुंबईतील देवालयेही आता ‘कॅशलेस’

निश्चलनीकरणाचा फटका बसून मुंबईतील अनेक देवस्थानांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय घट झाली होती.    कार्ड, इंटरनेट, डिजिटल वॉलेटद्वारे देणगी सुविधा निश्चलनीकरणानंतर रोखविरहित मार्गाचा अवलंब करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनीही आता मुंबईतील प्रमुख देवस्थानांना ‘कॅशलेस’ व्यवहारांमार्फत दान देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देवस्थानांची ऑनलाइन मार्गाने होणारी व्यवहारांची टक्केवारी वाढली आहे. दुसरीकडे ज्या देवस्थानांकडे या सुविधा उपलब्ध नाहीत त्यांचे निश्चलनीकरणानंतर कमी झालेले उत्पन्न अद्याप वाढलेले नाही. निश्चलनीकरणाचा फटका बसून मुंबईतील अनेक देवस्थानांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय घट झाली होती. परंतु भाविकांनी दानपेटीत रोख टाकण्याऐवजी ऑनलाइन किंवा अ‍ॅपआधारित मार्गाने दान करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सिद्धिविनायकासारख्या प्रसिद्ध मंदिरांमधील ऑनलाइन मार्गाने होणारे व्यवहार वाढले आहेत. सिद्धिविनायक मंदिरात नियमित होणारे अभिषेक आणि पूजेसाठी आकारण्यात येणारे शुल्क ऑनलाइन मार्गाने भरणाऱ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तु