Skip to main content

Posts

Showing posts with the label ‘रंगीत कपडे व्यक्तिमत्त्वाला उठाव आणतात.

माहिती-विज्ञानाचा धागा गुंफी..

‘रंगीत कपडे व्यक्तिमत्त्वाला उठाव आणतात. त्यामुळं कापड उद्योगात कापड रंगवण्याला खूप महत्त्व आहे अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. त्यांपैकी वस्त्रांचे कितीतरी प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरत असतो. पण फारसा त्यांच्या धाग्या-दोऱ्यांचा माग काढत नाही. हा माग ‘करामत धाग्या-दोऱ्यांची या पुस्तकात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षां जोशी यांनी काढला आहे. अश्मयुगाच्या शेवटी म्हणजे २५ हजार वर्षांंपूर्वी सुईचा शोध लागला आणि पानं किंवा प्राण्यांची कातडी व्यवस्थित शिवून त्यापासून मानवाला कपडे तयार करता येऊ  लागले. त्यामुळं माणसाची एक मूलभूत गरज अर्थात वस्त्रांची दुनिया काळाप्रमाणं विकसित होत गेली, अशी माहिती विषयाच्या प्रस्तावनेत मिळते आणि वस्त्रांच्या विविधांगी कहाणीत गुंगून जाण्यासाठी आपण सरसावतो. विषय बोजड होऊ  नये आणि माहिती नीट कळावी यासाठी तंतू आणि वस्त्र, भारतीय वस्त्रपरंपरा आणि कपडय़ांची निगा आणि काळजी असे तीन विभाग करण्यात आलेले आहेत. पहिल्या विभागात वनस्पतीजन्य, प्राणिजन्य आणि मानवनिर्मित तंतू, त्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया, त्यापासून तयार होणारी वस्त्रे ...