Skip to main content

Posts

Showing posts with the label देशात 20 लाख PoS यंत्रांची गरज

देशात 20 लाख PoS यंत्रांची गरज

मुंबई : कॅशलेस अर्थव्यवस्था आणि डिजिटल इंडिया प्रत्यक्षात साकारण्यासाठी देशात तब्बल 20 लाख पॉईंट ऑफ सेल (PoS) यंत्रांची गरज आहे, असे भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. नागरिकांमध्ये डिजिटल पेमेंटची सवय रुजविण्यासाठी काही आकर्षक योजना सादर करण्याची गरज आहे. अहवालातील आकडेवारीनुसार नोटाबंदी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक डेबिट कार्डावरून सरासरी दीड हजार रुपयांचा व्यवहार व्हायचा. यावरून लोकांमध्ये डिजिटल पेमेंट्सविषयी अत्यंत कमी जागरुकता असल्याचे दिसून येते. "PoS यंत्रांचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकारने विविध कर सवलती देण्याची गरज आहे. देशात आणखी 20 लाख PoS यंत्रांची गरज आहे", असे मत माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य आर्थिक सल्लागार एस.के. घोष यांनी व्यक्त केले आहे. लोकांना दैनंदिन व्यवहारात डिजिटल पेमेंटची सवय लावणे तितकेसे सोपे नाही. शिक्षणाचा अभाव, तंत्रज्ञानाची स्वीकारार्हता आणि पायाभूत सु...