Skip to main content

Posts

Showing posts with the label decline-in-the-revenue-of-apple-leads-cooks-salary-reduction

‘अॅपल’ कंपनीचा महसूल घटला!

स्मार्टफोनच्या विश्वात दबदबा असलेल्या अॅपल कंपनीचा महसूल गेल्या १५ वर्षांमध्ये प्रथमच घटला आहे. सन २०१६मध्ये आयफोनची विक्री घसरल्याने कंपनीचे सीईओ टिम कूक यांच्या वेतनात तब्बल १५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. अॅपलने सिक्युरिटिज‍् अँड एक्स्चेंज कमिशनकडे सादर केलेल्या कागदपत्रांवरून ही माहिती उजेडात आली आहे. २०१५मधील कामगिरीवरून कूक यांचे वेतन गेल्या वर्षी २० लाख डॉलर्सवरून ३० लाख डॉलर्स इतके वाढवण्यात आले होते. उद्दिष्ट गाठण्यात ‘अॅपल’ला अपयश सन २०१६मध्ये आयफोनची विक्री आणि नफा यासाठी ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यात कंपनी कमी पडल्याचे अॅपलने म्हटले आहे. २००७मध्ये आयफोन बाजारात दाखल करण्यात आल्यानंतर प्रथमच या स्मार्टफोनची विक्री घटल्याने २०१६ मध्ये कंपनीला केवळ २१५.६ अब्ज डॉलर्स इतकाच महसूल मिळाला. खरे तर आयफोन विक्रीतून २२३.६ अब्ज डॉलर्स महसूल मिळवण्याचे लक्ष्य कंपनीने ठरवले होते. विक्री का घटली? गेल्या तीन तिमाहींमध्ये आयफोनची विक्री घटत गेली. सॅमसंग आणि अन्य स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी अॅपलपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात दाख...