Skip to main content

Posts

Showing posts with the label शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला आज २८५ वर्षे पूर्ण

शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला आज २८५ वर्षे पूर्ण

शिवराम कृष्ण लिमये ऊर्फ खासगीवाले यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम झाले. मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला रविवारी (२२ जानेवारी) २८५ वर्षे पूर्ण होत आहेत. २२ जानेवारी १७३२ रोजी पूर्ण झालेल्या शनिवारवाडय़ाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला १६ हजार १२० रुपये खर्च आला होता. पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी माघ शुद्ध तृतीया या तिथीला (शके १६५१) म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाडय़ाच्या बांधकामाचा प्रारंभ केला. त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होऊन २२ जानेवारी १७३२ रोजी वाडय़ाची वास्तुशांत झाली, त्या दिवशीही शनिवार होता. वास्तुशांतीला २३३ रुपये आठ आणे खर्च आला होता. तीनशे वैदिकांनी वास्तुशांतीचे धार्मिक विधी केले. हा वाडा शनिवार पेठेमध्ये असल्याने त्याचे नाव शनिवारवाडा असे ठेवले गेले, अशी माहिती इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी दिली. शिवराम कृष्ण लिमये ऊर्फ खासगीवाले यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम झाले. बाजीरावांचा महाल, ...