Skip to main content

Posts

Showing posts with the label संपूर्ण तंत्रज्ञानही मराठीत यावे

संपूर्ण तंत्रज्ञानही मराठीत यावे - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क पु. भा. भावे साहित्यनगरी, (डोंबिवली) - ""मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. त्यासाठी अन्य भाषांतील साहित्य मराठीत आणि मराठीतील उत्तम साहित्य अन्य भाषांत गेले पाहिजे. चीन, जपान आणि कोरियासारख्या देशांनी संपूर्ण तंत्रज्ञान आपापल्या भाषांत आणले, त्यामुळेच त्यांना प्रगती करणे शक्‍य झाले,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उद्‌घाटक म्हणून बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही आपल्याला मराठीतून देता आले पाहिजे, इतकी मराठी भाषा ज्ञानवाहिनी बनली पाहिजे, असे सांगितले. ""मराठीने इतर भाषांनाही समृद्ध केले आहे. त्यामुळे अनुवादातून आदान-प्रदान अधिक वाढले पाहिजे. ज्येष्ठ हिंदी लेखक विष्णू खरे यांनी अनुवादासाठी अकादमी सुरू करण्याची केलेली सूचना निश्‍चितच चांगली आहे. आचारसंहिता संपल्याव