Skip to main content

Posts

Showing posts with the label चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकूया...

चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकूया...

उ री हल्ल्यामुळे आणि त्यानंतर भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर गोळीबार करत असून, आपले जवान हुतात्मा होत आहेत. तर दहशतवादीही पुन्हा पुन्हा भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याची हिंमत करत आहेत. पाकिस्तानचा मित्र देश म्हणजे चीन. भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी चीन पाकिस्तानला सहकार्य करत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. "शत्रूचा मित्र आपला शत्रू‘ या न्यायाने चीनही भारताचा अप्रत्यक्ष शत्रूच आहे. याशिवाय भारतामध्ये कोणतीही वस्तू आणि उत्पादने आली की हुबेहूब तशीच, अत्यल्प दरातील, बनावट उत्पादने भारतात उपलब्ध करून देत चीन भारतीय अर्थव्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडियावर सध्या चीनमधील भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व वस्तूंवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी नेटिझन्सनी मोहिमही उघडली आहे. चीनच्या वस्तूंवर आपण पूर्णपणे बहिष्कार टाकला, तर एकाअर्थी नाक दाबल्यास तोंड उघडू शके...