Skip to main content

Posts

Showing posts with the label fmcgs-highest-paid-ceo-is-a-94-year-old-school-drop-out/

पाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO

आपल्या स्वयंपाकघरात अनेक वर्षांपासून हक्काचं स्थान मिळवलेल्या एमडीएच मसाल्याच्या पॅकेटवर तुम्ही फेटावाल्या आजोबांचं चित्र पाहिलंच असेल ना?... किंवा मग टीव्हीवरच्या एमडीएचच्या जाहिरातीतील पीळदार मिशीवाले 'दादाजी' नक्कीच बघितले असतील?... ९४ वर्षांच्या या आजोबांनी बड्या बड्या उद्योगपतींना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला आहे. एमडीएच कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या या आजोबांचं नाव आहे, धरमपाल गुलाटी. फक्त पाचवीपर्यंत शिकलेल्या गुलाटी यांच्याकडे एमडीएच कंपनीच्या एकूण समभागांपैकी ८० टक्के हिस्सा आहे. या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटी रुपयांचा नफा कमावला असून २१ कोटी रुपये कंपनीचे सीईओ असलेल्या 'दादाजीं'च्या खात्यात जमा झालेत. त्यामुळेच त्यांच्या फेट्यात 'सर्वात श्रीमंत सीईओ' असा तुरा खोवला गेला आहे. गोदरेज कन्झ्युमरचे सीईओ आदि गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता आणि आयटीसीचे वाय सी देवेश्वर यांची कमाईही गुलाटी यांच्यापेक्षा कमी आहे. 'महाशियां दी हट्टी' ही कंपनी 'एमडीएच' या नावाने ...