Skip to main content

Posts

Showing posts with the label केरळमधील आंब्यांचा गोडवा चाखा

केरळमधील आंब्यांचा गोडवा चाखा

पुणे - लालबाग, हापूस, तोतापुरी, बदाम, पायरी आणि नाटी या केरळमध्ये उत्पादीत होणाऱ्या आंब्यांचा गोडवा चाखण्याचा आनंद पुणेकरांना यंदा मिळणार आहे. यंदा या आंब्यांची आवक चांगली होत असून, भावही नियंत्रणात आहे.  देशात आंब्यांचा सर्वात प्रथम हंगाम हा केरळमध्ये सुरू होतो. जानेवारी महिन्याच्या मध्यावधीत येथील आंबा बाजारात येऊ लागतो. दरवर्षी हा आंबा मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर भारतात विक्रीला पाठविला जात असतो. त्या तुलनेत पुण्याच्या बाजारात याची थेट आवक कमी असते. मुंबई येथील घाऊक बाजारातून त्याची पुण्यात आवक होत असते. यावर्षी केरळमधील आंब्यांची थेट आवक सुरू झाली आहे. केरळमधील पलकड जिल्ह्यातून आंबा पुण्याच्या बाजारात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून याची आवक चांगली होत असून, प्रतिदिन सरासरी अकराशे ते बाराशे पेटी इतकी आवक होत आहे, अशी माहिती व्यापारी रोहन उसरळ यांनी दिली. या आंब्याचा हंगाम साधारणपणे एप्रिल महिन्याच्या सु