Skip to main content

Posts

Showing posts with the label मार्क झुकरबर्ग लढवणार अमेरिकेची पुढची निवडणूक?

मार्क झुकरबर्ग लढवणार अमेरिकेची पुढची निवडणूक?

'फेसबूक'चा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तशी शक्यता त्याच्या अत्यंत जवळच्या मित्रांनीच वर्तविली आहे. एवढेच नव्हे तर नेतृत्व करणे हा झुकरबर्गचा गुणधर्म असून त्यानं गेल्या काही दिवसात जाणूनबुजून त्याची वेगळी इमेज तयार केल्याचंही त्याच्या मित्रांनी सांगितलं. त्यामुळं झुकेरबर्ग २०२४ मध्ये होणारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता बळावली आहे. झुकेरबर्ग राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात असं वृत्तच अमेरिकेच्या 'मेल ऑनलाइन'नं प्रसिद्ध केलंय. झुकरबर्ग यांनी राजकारणात जाण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेलं नसल तरी त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार ते आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. २०२४ मध्ये ते ४० वर्षाचे होतील. अमेरिकेच्या प्रत्येक प्रदेशात जाणार असल्याचा नवीन वर्षाचा संकल्पही झुकेरबर्ग यांनी आखला आहे. '२०१७ च्या शेवटपर्यंत अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात जाऊन तिथल्या लोकांशी मला संवाद साधायचा आहे. यापुर्वीही मी बराच फिरलो असून लोकांशी संवाद साधला आहे. त्यामुळ...