'फेसबूक'चा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग अमेरिकेच्या
राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तशी शक्यता त्याच्या
अत्यंत जवळच्या मित्रांनीच वर्तविली आहे. एवढेच नव्हे तर नेतृत्व करणे हा
झुकरबर्गचा गुणधर्म असून त्यानं गेल्या काही दिवसात जाणूनबुजून त्याची
वेगळी इमेज तयार केल्याचंही त्याच्या मित्रांनी सांगितलं. त्यामुळं
झुकेरबर्ग २०२४ मध्ये होणारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
लढविण्याची शक्यता बळावली आहे.
झुकेरबर्ग राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात असं वृत्तच अमेरिकेच्या 'मेल ऑनलाइन'नं प्रसिद्ध केलंय. झुकरबर्ग यांनी राजकारणात जाण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेलं नसल तरी त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार ते आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. २०२४ मध्ये ते ४० वर्षाचे होतील. अमेरिकेच्या प्रत्येक प्रदेशात जाणार असल्याचा नवीन वर्षाचा संकल्पही झुकेरबर्ग यांनी आखला आहे. '२०१७ च्या शेवटपर्यंत अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात जाऊन तिथल्या लोकांशी मला संवाद साधायचा आहे. यापुर्वीही मी बराच फिरलो असून लोकांशी संवाद साधला आहे. त्यामुळे हा अनुभव आता कामाला येईल. सुमारे ३० राज्यांचा दौरा करावा लागण्याचं आव्हान समोर असल्याचं सांगून तो म्हणतो, हे आव्हान मी स्विकारेन. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधेल. त्यांच्याशी बोलेन. ते काय करतात?, कसं जगतात?, कसं काम करतात? आणि भविष्यात त्यांना काय करायचं आहे? त्यांच्या काय अपेक्षा आहेत? ही सर्व माहिती त्यांच्याकडून मिळेल'.
झुकरबर्ग यांनी नुकतेच त्यांच्या 'चान झुकरबर्ग इनिशिएटीव्ह' या टीममध्ये अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ज्येष्ठ सल्लागारांपैकी एक डेव्हिड यांना घेतले आहे. सामाजिक बदलासाठी ही टीम काम करत असून त्याची जबाबदारी झुकरबर्ग यांच्या पत्नीवर आहे. ओबामांचे सल्लागार असलेले डेव्हिड यांनी ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मोहिमेची धुरा सांभाळली होती. त्यामुळे डेव्हिड यांच्यासोबत काम करायला उत्सूक असल्याचं झुकेरबर्ग यांनी नमुद केलयं.
Source

Comments
Post a Comment