मर्यादित शब्दांमध्ये अचूक व्यक्त होण्याच्या सेहवागच्या कौशल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले
लोकसत्ता ऑनलाईन |
January 9, 2017 4:50 PM
सेहवागने या आपल्या भन्नाट ट्विट्समधून गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३० लाखांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.
क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजीसाठी ओळखल्या गेलेल्या माजी
क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने निवृत्तीनंतर ट्विटरवर आपली जोरदार ‘बॅटींग’
सुरू केली. सेहवागचे हजरजबाबी ट्विट्स सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय
ठरले. सेहवागने या आपल्या भन्नाट ट्विट्समधून गेल्या सहा महिन्यांत तब्बल
३० लाखांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ला
दिलेल्या मुलाखतीत सेहवागने याबाबतची माहिती दिली आहे. ट्विटरवर बऱयापैकी
सक्रिय असल्याने गेल्या सहा महिन्यांत मी ३० लाखांची कमाई केली, असे
सेहवागने सांगितले.
मर्यादित शब्दांमध्ये अचूक व्यक्त होण्याच्या सेहवागच्या कौशल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळेच सेहवागचे ट्विटरवर लाखो फॉलोअर्स आणि त्याचे ट्विटर रिट्विट्स करणाऱयांच्या संख्या अधिक आहे. सेहवागचे ट्विटरवर ८० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. क्रिकेटच्या मैदानात सेहवाग जसा कमीत कमी चेंडूंमध्ये जास्त धावा ठोकायच्या त्याचप्रमाणे ट्विटरवर १४० शब्दांच्या मर्यादेत सेहवाग खूप मार्मिक आणि दखल घेण्यास भाग पडणारे ट्विट्स करतो.

वीरेंद्र सेहवाग आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खेळाडू व विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या हटके अंदाजात शुभेच्छा देतो. एखाद्या खेळाडूचा वाढदिवस आला की सेहवाग त्याला कोणत्या पद्धतीने शुभेच्छा देणार याकडे ट्विटरकरांचे लक्ष लागून असते. सेहवागचे काही ट्विट्स हे खूप भन्नाट असून त्याची दखल अनेक कार्यक्रमांमध्ये देखील घेतली गेली. सिनेजगतातील बिग बी यांच्यापासून क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक मान्यवरांनी सेहवागच्या हजरजबाबी ट्विट्सचे कौतुक देखील केले आहे.
Comments
Post a Comment