पुणे-कात्रज येथील प्राणी संग्रहालयात नवीन सिहांची जोडी आली
आहे. तेजस- सुबी असे नर-मादीचे नाव आहे. गुजरातमधील सक्कर बागेतून हा
सिंहाची जोडी कात्रजमधील प्राणी संग्रहालयात आणण्यात आली आहे. सध्या येथे
वाघ आहेत. आता पुणेकरांना तेजस-सुबीची भेट घेता येणार आहे.
गुजरातमध्ये 2010 मध्ये तेजस आणि सुबीचा जन्म झाला होता. 7
वर्षाची ही जोडी आता कात्रज उद्यानात चांगलीच रमताना दिसत आहे. तेजस-सुबीला
दररोज 8 किलोचे मटनाची खुराक दिला जात आहे. दोघांना महिन्याभरात 25 ते 30
हजार रुपये लागणार आहेत. तेजस-सुबीच्या बदल्यात विदेशी प्रजातीचे पाच
पक्षी सक्कर बागेत देण्यात आले आहेत.
कात्रजमध्ये 400 पेक्षा जास्त पक्षी...
कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला सध्या 400 पेक्षा जास्त प्राणी आहेत. आता तेजस-सुबीची भर पडल्याने उद्यानाची शोभा वाढली आहे.
source
Comments
Post a Comment