राज्य वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७
वस्त्रोद्योग हा देशातील महत्वाचा उद्योग आहे. “ कापूस ते तयार वस्त्र निर्मीती ” अशी
साखळी राज्यात ऩिर्माण झाल्यास मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. या वस्त्रोद्योग धोरणाची
माहिती संकेतस्थळावरुन प्रकाशीत करण्यात येत असल्याचे समजून आनंद वाटला.
देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनापैकी १४ टक्के,
सकल उत्पादनापैकी ४ टक्के तर एकूण निर्यातीपैकी १७ टक्के इतका वाटा वस्त्रोद्योग क्षे्त्राचा
आहे. वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता
आहे. राज्यातही सरासरी ६० ते ६५ लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. राज्यात उत्पादीत कापसावर
मूल्यावर्धनाच्या प्रक्रीया केल्यास राज्यामध्ये जवळपास सुमारे ११ लाख नवीन रोजगार
निर्मिती होणार आहे. यासाठी ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणुक अपेक्षित आहे.source
Comments
Post a Comment