आपल्या स्वयंपाकघरात अनेक वर्षांपासून हक्काचं स्थान मिळवलेल्या एमडीएच
मसाल्याच्या पॅकेटवर तुम्ही फेटावाल्या आजोबांचं चित्र पाहिलंच असेल ना?...
किंवा मग टीव्हीवरच्या एमडीएचच्या जाहिरातीतील पीळदार मिशीवाले 'दादाजी'
नक्कीच बघितले असतील?... ९४ वर्षांच्या या आजोबांनी बड्या बड्या
उद्योगपतींना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला
आहे.
एमडीएच कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या या आजोबांचं नाव आहे, धरमपाल गुलाटी. फक्त पाचवीपर्यंत शिकलेल्या गुलाटी यांच्याकडे एमडीएच कंपनीच्या एकूण समभागांपैकी ८० टक्के हिस्सा आहे. या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटी रुपयांचा नफा कमावला असून २१ कोटी रुपये कंपनीचे सीईओ असलेल्या 'दादाजीं'च्या खात्यात जमा झालेत. त्यामुळेच त्यांच्या फेट्यात 'सर्वात श्रीमंत सीईओ' असा तुरा खोवला गेला आहे. गोदरेज कन्झ्युमरचे सीईओ आदि गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता आणि आयटीसीचे वाय सी देवेश्वर यांची कमाईही गुलाटी यांच्यापेक्षा कमी आहे.
'महाशियां दी हट्टी' ही कंपनी 'एमडीएच' या नावाने प्रसिद्ध आहे. त्या कंपनीतील सगळ्यात उत्साही आणि मेहनती व्यक्ती म्हणजे धरमपाल गुलाटी. वयाच्या ९४व्या वर्षीही ते अगदी न चुकता कारखान्यात, बाजारात जातात आणि डीलर्सनाही भेटतात; अगदी रविवारीही. दादाजी किंवा महाशयजी सगळ्यांसाठी आदरणीय आहेत. त्यांच्या वडिलांनी - चुन्नी लाल यांनी १९१९ मध्ये पाकिस्तानातील सियालकोटमध्ये एक छोटंसं दुकान सुरू केलं होतं. त्या रोपाचा वटवृक्ष होईल, दुकानाचं १५०० कोटींच्या साम्राज्यात रूपांतर होईल, असा विचारही त्यांनी केला नव्हता. परंतु, धरमपाल गुलाटी यांच्या सहा दशकांच्या अथक प्रयत्नांमुळे आज एमडीएचनं मसाल्याच्या बाजारात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यासोबतच २० शाळा आणि एक हॉस्पिटल उभारून त्यांनी सामाजिक जाणिवेचंही दर्शन घडवलं आहे. विशेष म्हणजे, धरमपाल गुलाटी हे आपल्या पगारातील ९० टक्के रक्कम दान करतात.
फाळणीनंतर धरमपाल गुलाटी दिल्लीतील करोल बाग भागात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी भारतात १५ कारखाने सुरू केले. १००० डीलर्सना ते मसाल्यांचा पुरवठा करतात. त्याशिवाय, दुबई आणि लंडनमध्येही एमडीएचचं ऑफिस आहे. जवळपास १०० देशांमध्ये एमडीएच मसाल्यांची निर्यात होते. आज गुलाटी यांचं संपूर्ण कुटुंब - एक मुलगा आणि सहा मुली कंपनीचा सर्व कारभार व्यवस्थित सांभाळत आहेत आणि अर्थातच 'दादाजी' त्यांचे मार्गदर्शक आहेत
source

Comments
Post a Comment