Skip to main content

Posts

Showing posts with the label मावळातून ७० लाख गुलाब फुले परदेशात

मावळातून ७० लाख गुलाब फुले परदेशात

मावळ तालुक्यात अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाउसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यात आले आहे. ‘व्हॅलेन्टाइन डे’निमित्त तीन दिवसांत लाखो फुलांची निर्यात दर्जेदार आणि निर्यातक्षम गुलाब फुलांचे उत्पादन करणाऱ्या मावळ तालुक्यातून यंदा ‘व्हॅलेन्टाइन डे’साठी तब्बल सत्तर ते पंचाहत्तर लाख गुलाब फुले परदेशी बाजारपेठेत जाण्याची तयारी पूर्ण झाली असून पुढील दोन ते तीन दिवसांत या फुलांची निर्यात होणार आहे. त्यात ‘टॉप सिक्रेट’ नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला विदेशी बाजारात मोठी मागणी आहे. मावळ तालुक्यात अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाउसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यात आले आहे. मावळातील अडीचशे हेक्टर क्षेत्रापैकी दीडशे ते पावणेदोनशे हेक्टर क्षेत्रातील फुले परदेशी बाजारात ‘व्हॅलेटाइन डे’साठी पाठवली जातात. यंदा सत्तर ते पंचाहत्तर लाख फुलांची निर्यात होईल, असा अंदाज पवना फूल उत्पादक संघाचे वितरण प्रमुख मुकुंद ठाकर यांनी ‘लोकसत्ताशी’ बोलताना व्यक्त केला. ठाकर म्हणाले, पवना फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून वीस एकर क्षेत्रात सहा लाख गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यात आले अ...