Skip to main content

Posts

Showing posts with the label आधार सेवा देण्याऱ्या ५० बनावट साईट्स!

आधार सेवा देण्याऱ्या ५० बनावट साईट्स!

सरकारने डिजिटल इंडियाची घोषणा केली असून विविध अॅप्लिकेशन्सच्या आधारे डिजिटल पेमेंटसाठी सरकार आग्रह धरत आहे. डिजिटल पेमेंटची कास धरत ‘लेस कॅश’ अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी सरकार नागरिक, व्यापारी, दुकानदार यांना काही सवलतीही देऊ पहात आहे. याचा फायदा उठवत गुगल प्लेस्टोअरवर आधारसंलग्न अशी १२ बोगस अॅप्लिकेशन्स उपलब्ध असल्याचे यूआयडीएआयच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे आधारशी संबंधित १२ वेबसाइट्सही कार्यरत असल्याचे प्राधिकरणाच्या लक्षात आले. यावर तात्काळ कारवाई करून त्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ही सर्व अॅप्लिकेशन्स बंद करण्यात आली आहेत. याखेरीज आणखी २६ बनावट वेबसाइट्सही बंद करण्याचे आदेश संबंधित विभागांना यूआयडीएआयने दिले आहेत. अशा प्रकारे अनधिकृत वेबसाइट्स उदयाला आल्यास त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजय भूषण पांडे यांनी सांगितले आहे. आधारशी संबंधित माहिती केवळ आधार कायदा,२०१६ मध्ये समाविष्ट केलेल्या नियमांनुसारच देणे व आधारसंलग्न पेमेंट प्रणाली राबवणाऱ्या कंपन्यांनी घेणे या कंपन्यांना बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लं...