सरकारने डिजिटल
इंडियाची घोषणा केली असून विविध अॅप्लिकेशन्सच्या आधारे डिजिटल पेमेंटसाठी
सरकार आग्रह धरत आहे. डिजिटल पेमेंटची कास धरत ‘लेस कॅश’ अर्थव्यवस्थेकडे
वाटचाल करण्यासाठी सरकार नागरिक, व्यापारी, दुकानदार यांना काही सवलतीही
देऊ पहात आहे. याचा फायदा उठवत गुगल प्लेस्टोअरवर आधारसंलग्न अशी १२ बोगस
अॅप्लिकेशन्स उपलब्ध असल्याचे यूआयडीएआयच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे
आधारशी संबंधित १२ वेबसाइट्सही कार्यरत असल्याचे प्राधिकरणाच्या लक्षात
आले. यावर तात्काळ कारवाई करून त्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ही सर्व
अॅप्लिकेशन्स बंद करण्यात आली आहेत. याखेरीज आणखी २६ बनावट वेबसाइट्सही बंद
करण्याचे आदेश संबंधित विभागांना यूआयडीएआयने दिले आहेत.
अशा प्रकारे अनधिकृत वेबसाइट्स उदयाला आल्यास त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजय भूषण पांडे यांनी सांगितले आहे. आधारशी संबंधित माहिती केवळ आधार कायदा,२०१६ मध्ये समाविष्ट केलेल्या नियमांनुसारच देणे व आधारसंलग्न पेमेंट प्रणाली राबवणाऱ्या कंपन्यांनी घेणे या कंपन्यांना बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर आधार कायदा कलम ३८ प्रकरण ७ अन्वये कारवाई होऊ शकते. मुद्दाम आधारची माहिती गोळा करणे, दुसऱ्यांची आधार कार्डे डाउनलोड करणे, आधार कार्डांची कॉपी करणे हे सर्व दखलपात्र गुन्हे आहेत.
या बेकायदा सेवांवर बंदी
गुगल प्लेस्टोअरच्या साह्याने डाउनलोड करता येणारी आधारसंलग्न बनावट अॅप्लिकेशन्स तसेच वेबसाइट्स नागरिकांना ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करणे, आधार कार्ड तयार होण्याची प्रक्रिया कुठवर आली आहे याची माहिती देणे, प्लास्टिक आधार कार्ड देणे अशा सेवा पुरवता होत्या. या सर्व प्रक्रियेत ही अॅप्लिकेशन्स व साइट्स बेकायदा रीतीने आधार कार्डांची माहिती मिळवत होत्या. ही माहिती मिळवण्याची कोणतीही परवानगी यूआयडीएआयनेदिलेली नव्हती. त्यामुळे या सेवांवर यूआयडीएआयने बंदी घातली आहे. या बेवसाइट्स व अॅप्लिकेशन्सनी आधारचे बोधचिन्ह वापरले होते. असे बोधचिन्ह वापरणे बेकायदा समजले जाते.
एकच अधिकृत साइट
आधार क्रमांक जाणून घेणे, आधार कार्ड तयार झाले आहे काय ते जाणून घेणे, आधार कार्डाचा प्रिंट घेणे यासाठी www.uidai.gov.in हे एकच अधिकृत संकेतस्थळ आहे.
काही मोबाइल अॅप व वेबसाइट सर्वसामान्यांना आधारसंलग्न कामे करून देतो अशी भुरळ घालून त्यांच्याकडून आधार क्रमांकासह वैयक्तिक माहिती मागवत असल्याचे प्राधिकरणाच्या लक्षात आले. त्यामुळे या सर्वांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे.
- अजय भूषण पांडे, सीईओ, यूआयडीएआय
यूआयडीएआयची कारवाई
आधारसंलग्न सेवा देणाऱ्या १२ बनावट वेबसाइट्स, १२ मोबाइल अॅप्लिकेशन्स व २६ बेकायदा वेबसाइट्स शोधून काढून यूआयडीएआयने त्या बंद केल्या आहेत.
source

Comments
Post a Comment