खवय्यांसाठी हे नवीन वर्ष पर्वणीच ठरणार आहे. मित्र-मैत्रिणींच्या ब्रेक पार्टीमध्ये दिसणारे फ्रेंच फ्राइज उद्या एखाद्या मित्राच्या गळ्यात नेक टाय म्हणून दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. वर्षभरात कॅंडीज आणि इतर फास्टफूडमधील प्रिंटेड कपडे बाजारात आले होते. या वर्षापासून विविध फुडी ऍक्सेसरीजदेखील येत आहेत. कोणकोणत्या यम्मी ऍक्सेसरीज आपल्याला बाजारात दिसणार आहेत.
नेदरलॅंड्मधील रोमी डेबोमी या आर्टिस्ट मुलीला स्नॅक, फास्टफूडची प्रचंड आवड आहे. या खवय्येगिरीतून तिने आवडीचे केक, कुकीज यांचे नेकलेस बनविले आणि आपल्या मित्रांसाठी डेलिशयिस नेक टाय डिझाइन केले. या लाइटवेट यम्मी बो-टायसाठी तिने हलक्या फोमचा वापर करून त्याला क्लिप्स जोडल्या. या डेलिशयिस बो-टायची काही डिझाइन्स तुम्हाला नक्की आवडतील.
- टाय : मार्शोमलो, फ्रेंच फ्राइज, वाफ्ले, फार्फेल पास्ता, चीज, टॅंको, कॅण्डी
- यम्मी नेकलेस :
- डेलिशियस पर्स
source
Comments
Post a Comment