Skip to main content

पुणे

हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळामुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५०वर्षे प्रचलित होते.
शिवाजीच्‍या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.[ संदर्भ हवा ].समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी'; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.

नाव

पुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' , आणि बोलीभाषेत ’पुणं’ असे वापरले जात होते. ब्रिटिशांनी ’पुणं’चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला 'पूना' असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केल्यापासून हे शहर पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते.
पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे.

इतिहास

शनिवारवाडा
आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्‍नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. लाल महाल शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे आहेत. लाल महाल हे छत्रपति शिवाजी महाराजांचे, शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे तर विश्रामबागवाडा दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे निवासस्थान होते.

उपनगरे

पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
अप्पर इंदिरा नगर, अरण्येश्वर, आनंदनगर (सिंहगड रस्ता), आंबेगाव, एरंडवणे, औंध, कँप, कर्वेनगर, कल्याणीनगर, कात्रज, कोंढवा बुद्रुक , कोथरूड, कोरेगाव पार्क, खडकी, खराडी, गुलटेकडी, गोखलेनगर, घोरपडी, डेक्कन जिमखाना, दत्तवाडी, दापोडी, धनकवडी, धायरी, पद्मावती, पर्वती, पाषाण, पिसोळी, बाणेर, बालाजी नगर (सातारा रस्ता), बावधन, बिबवेवाडी, बोपखेल, भुसारी कॉलनी, मुंढवा, येरवडा, लोहेगाव, वडगांव (बुद्रुक), वडगांव शेरी, वडारवाडी, वाकडेवाडी, वाघोली, वानवडी, वारजे माळवाडी, विठ्ठलवाडी, विमाननगर, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सॅलिसबरी पार्क, सांगवी, सुस, हडपसर
पिंपरी चिंचवड- आकुर्डी, काळेवाडी, चिंचवड, तुकारामनगर, थेरगाव, निगडी, नेहरूनगर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, भोसरी , यमुनानगर, रहाटणी, रावेत, रूपीनगर , वाकड, संभाजीनगर, सांगवी (जुनी आणि नवी), हिंजवडी

अर्थकारण

इन्फोसिस, हिंजवडी, पुणे
पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारतातील बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारतातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.
पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्‌ज इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी.
विद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.
पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेअर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.
महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस., टेक महिंद्रा, विप्रो, पटनी, सत्यम, कॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जॉमेट्रिक सॉफ्टवेअर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.
महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेअर, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजीज, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., यूजीएस, कॉग्निझंट, सिमँटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.
पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या मोठ्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.
पुण्यातील काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालये -
  • कमिन्स इंडिया लिमिटेड
  • नीलसॉफ्ट
  • पर्सिस्टंट सिस्टम्स
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • बजाज ऑटो लिमिटेड
कमिन्स इंडिया लिमिटेड, टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात केपीआयटी कमिन्स, इन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमँटेक,आय.बी.एम.,कॉग्निझंट सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.

गणेशोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणार्‍या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशपरदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिव्हल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.
कसबा गणपती-पुण्याचे ग्रामदैवत
  1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
  2. तांबडी जोगेश्वरी गणपती
  3. गुरुजी तालीम गणपती
  4. तुळशीबाग गणपती
  5. केसरीवाडा गणपती (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.

खवय्येगिरी

सुजाता मस्तानी
काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची बाकरवडी, सुजाता व कावरे कोल्ड्रिंक्स यांची मस्तानी, बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. जंगली महाराज रस्ता, कँप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्ग्युसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली खूप प्रसिद्ध आहे. अमृततुल्य नावाची चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे मिसळ, वडा-पाव हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.
पुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, भेळ, पाणीपुरी इत्यादी गोष्ठी इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहेत. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते.
पुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज ह्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत. (महाराष्ट्रात उपाहारगृहाला हॉटेल म्हणतात.)

शिक्षण

पुणे विद्यापीठ
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्गसन महाविद्यालय, स.प.महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.
पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकरदेखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.
शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयुका (IUCAA), आघारकर संशोधन संस्था (ARI), सी-डॅक (C-DAC), राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV), राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था (NCCS), यशदा, भांडारकर संशोधन संस्था, द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC-Grapes), कांदा आणि लसुण- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC- Onion and Garlic), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER), ईर्षा (IRSHA), वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज (AFMC), राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (NCRA) सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.

प्राथमिक व विशेष शिक्षण

पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे असतो.
पुण्यातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC Board) किंवा केंद्रीय बोर्ड (सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. काही शाळा सीनियर केंब्रिज पुरस्कृत ICSE अभ्यासक्रम चालवतात. पुणे हे जपानी भाषेच्या शिक्षणाचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापीठासह इतरही अनेक संस्था जपानी भा़षेचे शिक्षण देतात. जर्मन (मॅक्स म्युलर भवन), फ्रेंच (आलियाँस फ्राँसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून रशियन, जर्मनफ्रेंच या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात.
source

Comments

Popular posts from this blog

Stores-Shopping-Pune

Blue Tonic blue (blu:) a colour that symbolizes men tonic (`tònik), a stimulant or energizer, the galaxy of casual men’s power clothing. Blue […] De Moza De Moza is from Adhira Exports who are pioneer in making knitted garments for the World’s Best Brands for over […] ...

Pune could well be called the Cycle City again

This city has more bicycles than cars and a lesson for India   Here is a lesson Indian citizens and authorities must learn for a better present and a sustainable future. At a time when people living in all major cities of India are suffering traffic jams and heavy vehicular pollution on a daily basis, here is a lesson Indian citizens and authorities must learn for a better present and a sustainable future. The traffic congestion problem in Indian cities cannot be solved merely by constructing new roads or flyovers, for the number of vehicles continue to rise along with the rising income of people. Being the second most populated country in the world, India would have to have to promote alternative, less polluting means of transport, especially for travelling short distances. Bicycles are the best means of transport in this regard. India needs to build infrastructure to make Indian city roads bike-friendly and the country can learn a lot from Copenhagen, which...