Skip to main content

Posts

केरळमधील आंब्यांचा गोडवा चाखा

पुणे - लालबाग, हापूस, तोतापुरी, बदाम, पायरी आणि नाटी या केरळमध्ये उत्पादीत होणाऱ्या आंब्यांचा गोडवा चाखण्याचा आनंद पुणेकरांना यंदा मिळणार आहे. यंदा या आंब्यांची आवक चांगली होत असून, भावही नियंत्रणात आहे.  देशात आंब्यांचा सर्वात प्रथम हंगाम हा केरळमध्ये सुरू होतो. जानेवारी महिन्याच्या मध्यावधीत येथील आंबा बाजारात येऊ लागतो. दरवर्षी हा आंबा मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर भारतात विक्रीला पाठविला जात असतो. त्या तुलनेत पुण्याच्या बाजारात याची थेट आवक कमी असते. मुंबई येथील घाऊक बाजारातून त्याची पुण्यात आवक होत असते. यावर्षी केरळमधील आंब्यांची थेट आवक सुरू झाली आहे. केरळमधील पलकड जिल्ह्यातून आंबा पुण्याच्या बाजारात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून याची आवक चांगली होत असून, प्रतिदिन सरासरी अकराशे ते बाराशे पेटी इतकी आवक होत आहे, अशी माहिती व्यापारी रोहन उसरळ यांनी दिली. या आंब्याचा हंगाम साधारणपणे एप्रिल महिन्...

खादीच्या नावाखाली 'फॅब इंडिया'ची फसवेगिरी

कॉटनचे रेडिमेड कपडे खादीचं लेबल लावून विकत असल्याप्रकरणी 'फॅब इंडिया' कंपनी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. खादीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवून खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं 'फॅब इंडिया'ला नोटीस पाठवली आहे. त्याला १५ दिवसात समर्पक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. खादीचे उत्तम कपडे मिळण्याचं ठिकाण म्हणून फॅब इंडिया स्टोअर ओळखलं जातं. तिथले स्वदेशी आणि त्यातही खादीचे कपडे घेताना ग्राहक किंमतीचाही विचार करत नाहीत. परंतु, फॅब इंडियात मिळणारे खादीचे कपडे हे खरंच खादीचे असतात का, याबद्दल आता संशय निर्माण झाला आहे. कारण, फॅब स्टोअर्समध्ये मिळणाऱ्या कपड्यांवर 'फॅब इंडिया कॉटन' असा टॅग असल्याचं खादी ग्रामोद्योग आयोगाच्या निदर्शनास आलं आहे. त्याची गंभीर दखल घेऊन आयोगानं कंपनीचे सीईओ विनय सिंह यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. कपड्यांवरच्या प्राइस टॅगवर फॅब इंडियानं खादी असा शब्द छापला आहे. हा टॅग कधीही काढून टाकता येतो. त्यातूनच कंपनी खादीचे कपडे विकत नसल्याचं स्पष्ट होतं, असं खादी ग्रामोद्योग आयोगानं ...

Grammy Awards 2017: Best and worst dressed celebrities at the red carpet

  source

फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडीलचा जीएसटी कर प्रणालीला विरोध

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 9 - देशातल्या नावाजलेल्या ई-कॉमर्समधल्या ऑनलाइन रिटेल कंपन्या फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अ‍ॅमेझॉननं जीएसटी कायद्याला विरोध दर्शवला आहे. जीएसटी मसुद्यातील कर प्रणाली(टीसीएस)च्या नियमांबाबत या कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. टीसीएस (टॅक्स कलेक्टड   अ‍ॅट सोर्स)अंतर्गत बाजारातून विक्रेत्याला मिळणारा फायदा आता सरकारकडे जमा करावा लागणार आहे. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार टॅक्स कलेक्टड   अ‍ॅट सोर्स या कर प्रणालीमुळे वर्षाला जवळपास 400 कोटी रुपयांचं भांडवल अडकून राहणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडून ऑनलाइन विक्रीला अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या मसुद्याला या महिन्याच्या शेवटी अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांच्या मते, आम्ही पूर्ण यंत्रणेत व्यापकता आणली आहे. हजारो आणि कोटींमध्ये आमचे ऑनलाइन विक्रेते आहेत. त्यातील काही जण उद्योजकही आहेत. तसेच काही ऑफलाइन रिटेलरही आहेत. जीएसटी कर ...

परवानगीशिवाय फोटो वापरणा-या ब्रँडची हृतिकने उडवली खिल्ली

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. १० - एखाद्या व्यक्तीची परवानगी न घेता त्याचे छायाचित्र जाहिरातीत वापरल्यास त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करता येते. परवानगशिवाय 'पेटीएम आणि रिलायन्स जिओ'च्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो  वापरल्याबद्दल सरकराने या दोन्ही कंपन्यांना नुकतीच नोटीस बजावली होती. ही घटना ताजी असताना अभिनेता हृतिक रोशनच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले. मात्र त्या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल वगैरे न उचलता हृतिकने त्यांची सोशल मीडियावरूनच खिल्ली उडवली.  'टॉमी  हिलफिगर' या कपड्यांच्या प्रसिद्ध ब्रँडने नुकतीच स्प्रिंग समर कलेक्शनची जाहीर केले असून त्यावरील जाहिरातीत हृतिक आणि त्याच्या दोन मुलांचे फोटो वापरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हृतिकचा या ब्रँडशी काहीही संबंध नाही किंवा तो त्यांचा अॅम्बॅसेडरही नाही. असे असतानाही त्या कंपनीने हृतिकच्या परवानगीशिवाय त्याचा व मुलांचा फोटो छापला. ही गोष्ट लक्षात येताच हृतिकने ट्विटरव...